Posts

ये रे ये रे पैसा

Image
  ये रे ये रे पैसा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाची समस्या असते, ती म्हणजे पैशांची समस्या. पैशांची चणचण ही प्रत्येकाला असते, मग तो श्रीमंत असो वा गरीब. आयुष्यातील गरजा भागविण्यासाठी प्रत्येकाला पैशांची गरज भासते आणि म्हणूनच प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमावण्याचा प्रयत्न करतो. काही जण नोकरी करतात तर काहीजण व्यवसाय करतात; काही जण उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील यासारख्या सेवा देतात तर काही जण एकत्र येऊन मोठा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करतात. जगात सर्वांचे उत्पन्न कधीच सारखे असू शकत नाही. काही लोकांचे उत्पन्न फार कमी तर काही जणांचे फार जास्त असते. उत्पन्नातील ही तफावत आपणास नेहमीच पहावयास मिळते. मग पैशांची समस्या कोणाला असायला हवी? फार कमी कमावणाऱ्या लोकांना पैशांची समस्या असायला पाहिजे. जास्त कमावणाऱ्या व्यक्तींना पैशाची समस्या नसावी. हे सर्वसामान्यांचे मत असते. पण खरी परिस्थिती तशी नसते. पैशांची समस्या ही प्रत्येकाला भासत असते. मग तो दरमहा 10000 कमावत असू दे किंवा एक करोड तो कितीही गरीब असो वा कितीही श्रीमंत कोणीही यापासून अलिप्त नाही. गरिबांना पैशांची टंचाई असते, हे...